निर्भयाच्या आईचा आक्रोश; म्हणाली ‘हा अन्याय आहे, कोर्ट आरोपींना आणखी किती वेळ देणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केंद्र सरकारच्या वतीनं दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकणातील चौघा नराधमांना फाशी देण्याची तारीख द्यावी अशी याचिका दाखल केली आहे. आज याचिकेवर सुनावणी करताना आरोपींना जोपर्यंत जगण्याचा अधिकार आहे तो पर्यंत जगू द्यावं असं सांगत न्यायालयाने फाशीची तारीख देण्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे आजही या नराधमांना फाशी कधी होणार ते समजू शकलेलं नाही.

कोर्टाच्या आजच्या निर्णयावर निर्भयाच्या आईने दुखी होत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ”आज, कोर्टाकडे शक्ती होती आणि आमच्याकडे वेळ होता. निर्भया प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी कोणत्याही औपचारीकता आता बाकी नाहीत. तरीही डेथ वॉरंट जारी करण्यात आलेलं नाही. हा अन्याय आहे. आता कोर्ट या आरोपींना आणखी किती वेळ देणार आहे? सरकारचा या सगळ्याला पाठिंबा आहे का?” असे प्रश्न निर्भयाच्या आईने उपस्थित केले.

दरम्यान, ‘देशाचा संयम संपुष्टात आला आहे’ या शब्दांमध्ये महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली आणि दिल्ली न्यायालयाच्या निकाला विरोधात दाद मागितली. सुप्रीम कोर्टानं ११ फेब्रुवारीला सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. गुन्हेगारांना कधी फाशी देणार या संदर्भात नोटीस देण्याची गरज आहे का? यावर निकाल देण्यात येईल असे सांगितले. या घटनांमधून निर्भयाच्या गुन्हेगारांना नक्की कधी फाशी होणार ही बाब अद्याप अस्पष्टच राहिल्याचे दिसत आहे. दोषींना फाशी देण्याच्या याआधी देण्यात आलेल्या दोन तारखा टळल्या आहेत. आता पुढची तारीखही देण्यात आलेली नाही. त्यामुळं निर्भयाच्या दोषींना कधी फाशी मिळणार या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरित आहे.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.