व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भर बाजारात पाण्याच्या टँकरने जमावाला चिरडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दिल्लीतील बदरपूर भागातील खान सब्जी मंडी या ठिकाणी दिल्ली जल बोर्डाचा टँकर अचानक गर्दीत घुसला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले (tanker hit five people)आहेत. जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या तो जोरदार व्हायरल होत आहे.

टँकर मालकाला अटक
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच त्याचा टँकर जप्त केला आहे. टँकर चालकाची (tanker hit five people) सध्या पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

लोकांना चिरडत टँकर पुढे गेला
हा अपघात (tanker hit five people) 14 जून रोजी घडला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाजारात उपस्थित लोक मोकळेपणाने फिरत आहेत आणि खरेदी करत आहेत. दरम्यान, दिल्ली जल बोर्डाचा पाण्याचा टँकर अनियंत्रितपणे गर्दीत घुसला. लोक पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र या टॅंकरचा वेग जास्त असल्याने काही लोक या टँकरखाली सापडतात आणि जखमी होतात. हा टँकर लोकांना पायदळी तुडवत पुढे जात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे पण वाचा :
धक्कादायक ! आरोपी पतीने संतापाच्या भरात मुलांसमोरच पत्नीचा गळा चिरून केली हत्या

500 रुपयांच्या नियमित गुंतवणुकीने लाखो रुपयांचा फंड कसा तयार करावा हे समजून घ्या

शतरंज का बादशहा म्हणजे देवेंद्र फडणवीस; रावसाहेब दानवेंकडून कौतुक

शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा अस राऊत म्हंटले नाहीत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन

LPG गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे !!!