नवी दिल्ली | जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असून या बाबत केंद्र सरकारने लक्ष घालून संबंधीतावर कारवाही करावी अशी मागणी आज लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी केली. त्यानंतर त्यांच्या या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी कृषी राज्यमंत्री उभा राहिले आणि त्यांनी हा विषय केंद्राच्या अक्तारित येत नाही असे म्हणले. तुम्हीच या संदर्भात आमच्याकडे तक्रार दिली तर त्या संदर्भात आम्ही तपास करून घेऊ असे केंद्रीय कृषीराज्य मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी म्हणले आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राज्य शासनाला प्राप्त अहवालानुसार राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्याची समस्या निवारण्याचे उद्दिष्ट घेऊन जलयुक्त शिवार योजना सुरु करण्यात आली मात्र जलयुक्त शिवार योजना भ्रष्टाचाराने बरबटली त्यामुळे या योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींवर कारवाही केली जावी असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठीउभा राहिलेल्या केंद्रीय कृषीराज्य मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी हा आमच्या कार्यक्षेत्रात येणारा मुद्दा नाही म्हणत हात झटकले. तर तुम्ही तक्रार दिल्यास आम्ही याचा तपास करू असे विधान देखील कृषी राज्य मंत्र्यांनी यावेळी केले. तसेच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात दुष्काळ निवारणाचे काम अत्यंत चांगल्या पध्द्तीने केले जात आहे हे सांगायला पुरुषोत्तम रुपाला विसरले नाहीत.
मी काय म्हणतो ते 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच काय झालं ?
मंत्रालय पेटवल म्हणजे झालं काय ?
लैच डोकेबाज राव तुम्ही..
बारामतीच्या करामती..