टीम हॅलो महाराष्ट्र। निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याचा दयेचा अर्ज शुक्रवारी राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर त्याने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळं या गंभीर प्रकरणातील तारीख पे तारीखचा सिलसिला अजूनही कायम आहे. गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन असल्याचा दावा करत पवन याने स्पेशल लीव पिटीशन (एसएलपी) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
दोषी पवन कुमारने हायकोर्टाच्या १९ डिसेंबरच्या आदेशाला आव्हान दिलं आहे. या आदेशात हायकोर्टाने बनावट कागदपत्र जमा केल्याबद्दल आणि न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल त्याच्या वकिलावर ताशेरे ओढले होते. दरम्यान, अन्य दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज शुक्रवारी राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर या सर्व दोषींच्या फाशीवर दिल्ली हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांना १ फेब्रुवारीला पहाटे सहा वाजता फाशी दिली जाणार आहे. त्याबाबतचा डेथ वॉरंटही शुक्रवारी नव्याने जारी करण्यात आला आहे.