दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू,१३५ जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईशान्य दिल्लीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये रविवारी आणि सोमवारी हिंसाचार उफाळला. ईशान्य दिल्लीतील मौजपूरपासून सुरू झालेल्या हिंसाचाराचे लोण आता आता दिल्लीच्या बर्‍याच भागात पसरले आहे. रविवार, २३ फेब्रुवारी रोजी सोमवारी झाफराबाद, मौजपूर, बाबरपूर, गोकुलपुरी, करावल नगर, भजनपुरा, यमुना विहारसह अनेक भागात हिंसाचार झाला. हिंसाचाराच्या या विविध घटनांमध्ये दिल्ली पोलिसांच्या हेड कॉन्स्टेबलसह ९ जणांना जीव गमवावा लागला आहे. दिल्लीतील गुरु तेगबहादूर (जीटीबी) रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील कुमार यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये हिंसक घटनांमध्ये आतापर्यंत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३५ जखमींना जीटीबी रुग्णालयात आणले गेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जखमींमध्ये अनेकांना गोळ्या लागल्या आहेत.

आज सकाळपासूनच काही ठिकाणी हिंसाचार सुरू आहे. मौजपूर-बाबरपूर आणि ब्रह्मपुरी भागात पुन्हा दगडफेकीच्या घटना घडल्या. भजनपुरा येथेही हिंसाचाराची घटना झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांसमोर रस्त्यावरील नागरिकांना मारहाण केली जात आहे, दुकानांमध्ये लूटमार केली जात आहे. दरम्यान, संपूर्ण ईशान्य दिल्लीत एका महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

दिल्लीच्या परिस्थितीबाबत गृहमंत्री अमित शहा आणि अरविंद केजरीवाल यांच्यात आज झालेल्या बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय गृह मंत्रालयाने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सैन्याला बोलण्यास नकार दिला आहे. केंद्रीय दल आणि पोलिस आपले काम करीत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांची संख्या पर्याप्त आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी अफवा थांबवण्याबरोबरच शांततेचे आवाहन केलं आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment