सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जरंडेश्वर कारखान्याच्या बेकायदेशीर विक्री व्यवहारास जबाबदार असलेल्या गुरू कमोडिटी प्रा. लि., जरेंडेश्वर शुगर प्रा. लि.राज्य सहकारी बँकेसह इतर जिल्हा बँकांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी. या मागणीसाठी जरंडेश्वर कारखान्याच्या संचालकांनी भाजपचे राज्यसभेचे खासदार किरीट सोमय्या यांची भेट घेतली.
कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर प्रकरणी किरीट सोम्मया यांची मुंबईत त्याच्या निवासस्थानी भेट घेण्यात आली. यावेळी जरंडेश्वरचे उपाध्यक्ष श्री. सापते, शंकरराव भोसले, कार्यकारी संचालक किसनराव घाडगे, संचालक पोपटराव जगदाळे उपस्थित होते. तसेच कारखाना सभासदांच्या मालकीचा होऊन तो तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
चिमणगाव येथील जरंडेश्वर कारखाना राज्य बॅंकेने जप्त करून नाममात्र किमतीला गुरू कमोडिटीला विकला असून बॅंकेने अन्यायकारक भूमिका घेतली असल्याचा आरोप डाॅ. शालिनीताई पाटील गेली 18 वर्षे केला आहे. काही दिवसापूर्वी इडीची या कारखान्याला नोटीस आलेली आहे. तेव्हा या सर्व गोष्टीस जबाबदार असणाऱ्या गुरू कमोडिटी तसेच बॅंकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संचालकांनी किरीट सोमय्याकडे केली.