कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
साताऱ्यातील आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार्यालयातील कर्मचारी आणि एजंटमधील संभाषणाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत चव्हाण साहेब कोण, संभाषणात असलेले एजंट, क्लार्क अन् मॅडम या सर्वांचाच लाच मागताना समावेश आहे. त्यामुळे आता या सर्वांवर कारवाई होणार का असा आता सवाल उपस्थित केला जावू लागला आहे.
सातारा आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचाराचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होऊ लागलाय. परराज्यात तपासणी झालेल्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी पैसे वाढवून घेण्याबाबतचा संवादाच्या हा व्हिडीओ चांगलाच सोशल मिडियावर व्हायरल होवू लागला आहे.
सातारा RTO कार्यालयातील लाच मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/nYzeD4ByY2
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) October 22, 2022
यामध्ये कामासाठी अगोदर साहेब पाचशे रुपये घेत होते, आता ते दोन हजार मागत आहेत, अशा प्रकारचा हा संवाद झाला आहे. 186 गाड्यांसाठी प्रत्येकी दोन हजार रुपये मगितल्यानं साताऱ्यातील आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. आता याची पालकमंत्री आणि मुख्यमंत्री चौकशी करणार का याकडे लक्ष लागले आहे.