अहिरे येथील अनधिकृत वीटभट्टी बंद करण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड

अहिरे (ता.खंडाळा) येथील गावातील अनधिकृत वीटभट्टी बंद कऱण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून कऱण्यात आलेली आहे. या वीट भट्टीमुळे धुराचा त्रास होत असून त्यापासून होणारे आजार उदभवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सदरची वीटभट्टी हटविण्याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.

याप्रश्नी ग्रामस्थांच्या वतीने सचिन लवांडे यांनी जिल्हाधिकारी, खंडाळा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे. दिनांक ३१ मे २०२० रोजी सचिन लवांडे यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर दिनांक २४ जुलै २०२० रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्याकडून या वीटभट्टी संदर्भात खंडाळा तहसीलदार यांना चौकशी करुन आपले स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी, असा पत्रव्यवहार ही करण्यात आलेला होता. तेव्हा हा येथील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठी समस्या बनलेला असताना ही सुटलेला नाही. सचिन लवांडे यांनी दिनांक २४ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा जिल्हाधिकारी यांना वीट भट्टी अजून सुद्धा गावातून हटविण्यात आली नाही. तुम्ही पाठविलेल्या नोटीसीची अंमलबजावणी झालीच नाही. कडक कार्यवाही करावी, अशी विनंती ई-मेल द्वारे करण्यात आलेली होती.

दिनांक ३ मार्च रोजी खंडाळा तहसीलदार यांना महिलांनी एकत्रित येत निवेदन दिले होते. या वीट भट्टीवर कार्यवाही नाही केली, तर महिलामंडळ तहसील कार्यालया समोर उपोषण करू असे ही निवेदनात म्हटले होते. तहसिलदारांच्या आदेशानुसार सर्कल ऑफिसर आणि तलाठी या वीट भट्टी बाबत पंचनामा केला. परंतु वीट भट्टी हटविण्यात आलेली नाही. प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ही समस्या ई-मेल द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन आणि पर्यावरण कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे तसेच संबधित विभाग यांच्याकडे पाठविण्यात आलेली आहे.

उशीरा भेटलेला न्याय हा अन्यायच असतो

ग्रामस्थ कोरोना आणि जीवघेणा प्रदूषण या दोन्ही मध्ये जीव मुठीत घेऊन जगत आहेत. अजूनही ग्रामस्थांना न्याय मिळेना. गेली 25 वर्ष वीटभट्टी चालू आहे. त्याबद्दल न्याय निवाडा होणार की नाही ? आता तहसिलदार साहेब वीटभट्टी हटवणार की जप्त करणार ? याची वाट पाहत असून उशीरा भेटलेला न्याय हा अन्यायच असतो, हेही प्रशासनाने लक्षात ठेवायला हवे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment