महापुरुषांची स्मारके उभारणीसाठी मागणी ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – संतांची भूमी असलेल्या पैठण शहरात महापुरुषांच्या स्मारकासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच लिगल सेल यांच्या वतीने पैठणचे तहसीलदार तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन महापुरुषांची स्मारके तात्काळ उभारण्याची मागणी केली आहे.

पैठण शहरात छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी जागा नियोजीत करून स्मारकांची उभारणी करण्यासाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रलंबीत स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्चे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुभाष बाबुराव खडसन, लिगल सेल पैठण यांनी पैठणचे तहसीलदार तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन स्मारकांची उभारणी करण्याची मागणी केली.

तसेच पैठण शहर हे धार्मिक व पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात, ते देखील या महापुरुषांची स्मारकांना भेट देऊन नतमस्तक होतील व पैठणचे शहराचे नाव जागतिक पातळीवर लौकीक होईल, व ही बाब पैठणवासियांसाठी अभिमानास्पद असेल, असेही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment