कराड प्रतिनिधी|सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील लेंढोरी या गावातील एका 14 वर्षीय मुलाला सर्पदंश झाला होता. परंतु सर्पदंश लस व उपचार वेळेत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
सर्पदंश झाल्याने रोहित सुतार (वय 14) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या मुलाला पाटण व कराड येथे वेळेत सर्पदंश लस व उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याने या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या आरोग्य यंत्रणेची चौकशी करून कारवाई करावी. राष्ट्रीय लोक सुराज्य संघटनेचे सुनिल चव्हाण व मुलाचे नातेवाईक यांनी पोलिस व तहसिलदार पाटण यांचेकडे चौकशीची मागणी केली आहे.
पाटण तालुक्यातील या लहान मुलाला सर्पदंश झाल्यानंतर पाटण शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु तेथे उपचार व लस मिळाली नाही. त्यानंतर कराड येथील उपजिल्हा रुग्णालयातही लस, उपचार न मिळाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.