साताऱ्यातील एकाला बेड्या : व्यापाऱ्याला अश्लील फोटो व्हायरलची धमकी देवून खंडणीची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील व्यापार्‍याला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या सातारा येथील संशयिताला वडगाव पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सापळा रचून बेड्या ठोकल्या. तसेच व्यापाऱ्याकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली जात होती. या प्रकरणात कमलाकर यशवंत मुळे (वय- 33, रा. मंगळवार पेठ, सातारा, सध्या हनुमान मंदिरजवळ, वडगाव) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित कमलाकर यापूर्वी व्यापार्‍याकडे चालक म्हणून कामाला होता. लुल्ला नावाने तो परिचित होता. त्याच्या संशयास्पद वर्तनामुळे त्याला कमी करण्यात आले होते. मात्र व्यापारी व अन्य मंडळींच्या आर्थिक उलाढालीची त्याला माहिती होती. चार दिवसांपूर्वी त्याने व्यापार्‍याशी संपर्क साधला.

यावेळी कमलाकरने व्यापाऱ्याकडे पाच लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करीत पूर्तता न केल्यास अश्लील फोटो व्हायरल करून कुटुंबीयांच्या बदनामीची धमकी दिली. या प्रकारामुळे व्यापार्‍याने मित्रांची मदत घेतली व पोलिस निरीक्षक घोळवे यांच्याशी संपर्क साधला व फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संशयिताला इस्लामपूर-आष्टा रोडवर ताब्यात घेतले.

Leave a Comment