शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी 5 कोटींची मागणी हास्यापद : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

0
58
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जावली | २६ नोव्हेंबरला मुंबईवर हल्ला करून शेकडो लोकांचे प्राण घेणा-या शस्त्र सज्ज अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडताना हौतात्म्य आलेल्या तुकाराम ओंबळे यांचा पराकम आजही समस्त भारतीयांच्या हृदयात ठसून राहिला आहे. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या नियोजित स्मारकासाठी 10 कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय यापुर्वीच्या झालेला असताना, आता स्मारकासाठी 5 कोटी रूपयांच्या निधीची मागणी करणे हे हस्यास्पद असून शहीद ओंबळे यांच्या अतुलनीय कामगिरीची अवहेलना करणारे आहे, असे मत आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी व्यक्त केले.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले म्हणाले, हुतात्मा ओंबळे यांच्या पराक्रमामुळे जावली तालुक्यातील केंडबे हे छोटेशे गाव देशात प्रसिध्द झाले. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पराक्रमाची दखल घेवून राज्य सरकारने त्यांच्या जन्मगावी केंडबे येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. त्यांचे स्मारक झाल्यास केडवे गावचे महत्व वाढून ओंबळे यांचे स्मारक युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. स्मारक झाल्यास पर्यटन वृध्दीच्या दृष्टीने अश्वासक वातावरण निर्माण होवून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. यासाठी शहिद ओंबळे यांच्या भव्य स्मारकावरोवरच केंडबे गावास अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा व गावाचा सर्वागिण विकास व्हावा यासाठी जास्तीजास्त निधी देण्याची मागणी आपण वेळोवेळी शासनाकडे केली आहे.

केंडबे गावातील स्मारकासाठीच्या जमिन हस्तांतरणाच्या कामात वास्तविक जिल्हा प्रशासनाने पुढे होत कागदपत्रांची पूर्तता करून स्मारकाचे कामास गती देणे गरजेचे होते. मात्र निव्वळ दप्तर दिरंगाईमुळेच स्मारकाचे काम गेली अनेक वर्षे रखडले स्मारकाच्या निधीसाठी शासन पातळीवर वेळोवेळी पाठपुरावाही केला असून यापूर्वी स्मारक निधी संदर्भात झालेल्या शासनाच्या बैठकीत शहीद ओंबळे यांच्या स्मारकासाठी व केंडबे गावच्या विकासाठी 10 कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता 5 कोटी रूपयांची मागणी करणे ही एकप्रकारे अवहेलना करण्याचाच प्रकार असल्याचे आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here