ना ब्लू टीक, ना मेसेज रीड झाल्याचे समजणार; व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरबद्दल जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपकडून नेहमीच आपल्या युजर्ससाठी विविध अपडेट, नवे फीचर्स लाँच करण्यात करण्यात येतात. आता व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या iOS बीटा युजर्ससाठी नवे अपडेट आणले असून जे चॅटिंग अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. नव्या अपडेटमध्ये जे iOS युजर्स व्हॉट्सअ‍ॅप बीटाचा वापर करतात, ते चॅट ओपन न करताच नोटिफिकेशनमध्येच संपूर्ण चॅट पाहू शकतात. मेसेज पाहण्यासह ते रीड करण्याचाही पर्याय युजर्ससाठी देण्यात आला आहे. यामुळे मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला रिसिव्हरने मेसेज रीड केला की नाही हे समजणार नाही.

WABetaInfoने दिलेल्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप हे फीचर iOS युजर्ससाठी 2.21.140.9 वर्जनमध्ये रोलआउट करणार आहे. हे बीटा अपडेट अ‍ॅपमध्येच Interact करण्यासाठी एक नवं फीचर आहे.युजर्स चॅट कंटेंट पाहण्यासाठी नोटिफिकेशनला एक्सपेंड करू शकतात. युजर्स एका चॅटमध्ये जुने मेसेज वाचण्यासाठी स्क्रॉलसुद्धा करू शकतात. युजर चॅट प्रिव्ह्यूसुद्धा पाहू शकतात. यामुळे तुम्ही चॅट रीड केल्यानंतरही ब्लू टीक येणार नाही. रीड रिसिप्ट ऑन असल्यावरही तुम्हाला यात ब्लू टीक दिसणार नाही. जर युजरने नोटिफिकेशनमध्येच मेसेजचा रिप्लाय केल्यावर सर्व ग्रे टीक ब्लूमध्ये दिसतील.

तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली हाय कोर्टात त्यांनी नवी प्रायव्हसी पॉलिसी सध्या स्वेच्छिक केली असल्याचे सांगितले आहे. जोपर्यंत डेटा प्रोटेक्शन बिल लागू होत नाही, तोपर्यंत प्रायव्हसी पॉलिसी स्वेच्छिक राहणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी सध्या लागू करण्यात येणार नाही. याचा अर्थ प्रायव्हसी पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट न केल्यासही युजरला ज्या सुविधांचा लाभ मिळत आहे तो सुरूच राहणार आहे. यावर कोणत्याही मर्यादा घालण्यात येणार नाहीत, असं व्हॉट्सअ‍ॅपकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment