दादा.. डोंगर कडा अख्ख्या गावाला गिळणार हाय… आम्हाला इथ रहायच नाय; धावलीतील ग्रामस्थांची मागणी

0
57
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

दादा.. डोंगर..कडा अख्ख्या गावाला गिळणार… आम्हाला नाय इथ रहायच..आम्हाला सुरक्षित ठिकाणी आसरा द्या.. नायतर माळीण सारखं ढिगाऱ्याखालून आम्हाला काढण्याची यळ तुम्हावर येवू देवू नका?, असा प्रश्न महाबळेश्वर तालुक्यातील धावली येथील बाबुराव पार्टे या वयोवृद्ध आजोबांशी गावकऱ्यांनी राज्यसरकारला केला आहे. मुसळधार पावसामुळे धावली गावावर भूस्खलनामुळे दरडी कोसळण्याच्या धोका आहे. त्यामुळे अजूनही येथील सर्व ग्रामस्थ जीव मुठीत धरून जगत आहेत. मायबाप शासनाने आमच्या गावचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, महाबळेश्वर तालुक्यातील धावली गावामध्ये दरड कोसळण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. गावच्या वरच्या बाजूला सुमारे ५०० फूट उंच डोंगरकडा आहे आणि त्याच्या वरती तीव्र उतार असलेला सुमारे २५० फूट उंच डोंगरकडा आहे. या दोन्ही डोंगरकडयाच्या मधल्या भागात भूस्खलन होत आहे. यामुळे प्रचंड प्रमाणावर दरड आणि माती खाली वसलेल्या धावली गावाच्या वरच्या बाजूने कोसळत आहे.

दोन्ही डोंगरकडाच्या मधील भागात भूस्खलन होत असल्यामुळे वरच्या डोंगरकड्याच्या खालील दगड मातीचा भराव कमी होत आहे. त्यामुळे वरील डोंगरकडा कोणत्याक्षणी निसटून धावली गावावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे कडे गावासाठी अत्यंत धोकादायक बनले झालेले आहेत. धावली गावाला डोंगरकाठावरील जावली तालुक्यातील डांगरेघर ग्रामपंचायत आहे. परंतु ६० घरे मात्र महाबळेश्वर तालुक्यात आहेत. त्यामुळे विचित्र अवस्थेत अडकलेल्या धावलीकरांच्या मदतीसाठी वाली कोण ? असा सवाल उपस्थित होत असून यामुळे गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न भिजत पडला आहे. याचाही विचार तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी करावा, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here