कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना योध्दा कर्मचारी परिषदेचे उपोषण

0
77
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कोरोना संकट निवारणासाठी दीड वर्षापूर्वी आरोग्य विभागातील कंत्राटी स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या 798 कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, कोविड काळातील घोषित केलेला प्रोत्साहन भत्ता तात्काळ द्यावा, यासह इतर मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेच्या वतीने उपोषण करण्यात आले.

या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहेल पठाण, विराज शेटे, श्रेणिक काळे, सुनील जाधव, उमेश गायकवाड, डॉ. विशाल वीरकर, गौरी भोसले, प्रज्ञा गायकवाड व सर्व तालुकाध्यक्ष व कर्मचारी उपस्थित होते. कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी गेल्या वर्षी आरोग्य विभागात कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आम्ही पहिल्या लाटेपासून सेवा देत असूनही सेवामुक्त करण्यात आले आहे. डाटा एन्ट्रीसारखी ऑपरेटरसारखी महत्त्वाची पदे बाह्य यंत्रणेद्वारे प्राप्त निधीतून दहा दिवसांपूर्वी भरण्यात आली आहेत.

मात्र, कोरोनात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून अन्याय केला आहे. राज्य सरकारने कंत्राटी कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत सामावून घेणे, मागण्यांवर निर्णय होत नाही, तोपर्यंत एनआरएचएमप्रमाणे ११ महिन्यांचा सेवा कार्यकाल देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा, कोरोना संकट संपत नाही तोपर्यंत योद्ध्यांना सेवामुक्त करून नये. थकीत मानधनाचा प्रश्न निकाली काढावा, अशा मागण्याही पत्रकाद्वारे करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here