हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कुठल्याही देशातील लोकशाही हा सतत चालणारा प्रवास आहे आणि असं असेल तरच लोकशाही टिकून राहते अन्यथा ती नामशेष होते असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी आज व्यक्त केले.
डीपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स, फर्ग्युसन कॉलेज पुणे तर्फे फिरोदिया सभागृहात भारतीय लोकशाही या विषयावर प्राध्यापक प्रभाकर देसाई यांनी सुहास पळशीकर सरांची मुलाखत घेतली त्यावेळी सरांनी भारतीय लोकशाहीचे विविध पैलू उलगडून सांगितले.
सध्या भारतात माध्यम नावाचा राक्षस भयंकर बोकाळला आहे.या राक्षसाने भारतीय लोकशाही खुजी करण्याचा विडाच उचलला आहे.तसेच हा राक्षस आजवरच्या इतिहासात सगळ्यात भयंकर खालच्या पातळीला गेला आहे,असेही पळशीकर म्हणाले.पण इतके असेल तरीही अजूनही आशा जागृत आहेत लोकशाहीच्या अनेक संस्था आपले काम व्यवस्थित करतील तर भारतातील लोकशाही अजून बळकट होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला फर्ग्युसन कॉलेजचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रकाश पवार,माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे,शमसुद्दीन तांबोळी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.