Sunday, May 28, 2023

या जिल्हयातील ४१२ धोकादायक इमारती पाडण्याचा आयुक्तांचा आदेश

प्रथमेश गोंधळे । सांगली प्रतिनिधी

सांगली महापालिका क्षेत्रात तब्बल ४१२ धोकादायक इमारती आहेत. यातील सर्वाधिक २६६ मिरजेत आहेत. तर सांगलीत १०४  आणि कुपवाड मध्ये ४२ धोकादायक इमारती आहे. या इमारती तातडीने पाडण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले चारही प्रभाग समित्यांचे सहायक आयुक्तांना दिले आहेत.

आयुक्त कापडणीस यांच्या आदेशाने महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा सर्वे करण्यात आली. वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपीक व सहायक आयुक्तांनी हा सर्वे करून आपला अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. या सर्वे तब्बल ४१२ इमारती धोकादयक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याती सांगलीतील प्रभाग समिती क्रमांक १ मध्ये ८१, २ मध्ये २३ तर कुपवाड मधील प्रभाग समिती क्रमांक ३ मध्ये ४२ व मिरजेतील प्रभाग समिती क्रमांक ४ मध्ये २६६ धोकादायक इमारती आहेत.

गेल्या वर्षभरात केवळ ६ धोकादायक इमारती पाडण्यात आल्या आहेत. चारही प्रभाग समित्यांच्या सहायक आयुक्तांनी तात्काळ धोकादायक इमारती पाडण्याची कारवाई सुरु करावे असे आदेश आयुक्त कापडणीस यांनी दिले आहेत. या इमारती रिकाम्या करण्यासाठी पोलीसांची मदत घ्यावी, बांधकाम विभागाकडून संबधीत इमारतींचे स्टेबॅलिटी सर्टिफिकेट घ्यावे व कारवाईत सातत्य ठेवण्याची सुचनाही आयुक्तांनी केली आहे.