Wednesday, October 5, 2022

Buy now

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणीसह विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांना देण्यात आले.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मान्य केलेल्या वेतनाची आर्थिक तरतूद करा, जाहीर तारखेपासून फरकासह वाढीव वेतन द्या, उत्पन्न वसुलीची अट रद्द करा, लोकसंख्येच्या जाचक आकृतीबंधात सुधारणा करा, शंभर टक्के राहणीमान भत्ता शासनाच्या तिजोरीतून द्या, ग्रच्युईटीसाठीचे निकष बदलून 10 कर्मचारी आणि 50 हजारांची मर्यादा करा, अभय यावलकर समितीच्या शिफारशी मान्य करा, दहा टक्के आरक्षणाप्रमाणे रिक्त जागावर जिल्हा परिषदेमध्ये भरती करा.

अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. तसेच गुरुवारी कोल्हापूर येथे याच मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब झुरे, अ‍ॅड. राहुल जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.