हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकर आपल्या खास शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांनी एखादी गोष्ट करायची ठरवले तर काय करतील याचा नेम नाही. अशाच प्रत्यय मध्यन्तरी आला. भाजपच्या एका कार्यकर्त्याने पुण्यातील औंध इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर उभारत मूर्तीही बसवली. त्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आरती करीत साकडे घातले. तर पुण्यातील देवांच्या नावे ठेवण्याच्या शैलीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज कार्यक्रमात टोलेबाजी केली. “पुणेकर काय करतील याचा नेम नाही. त्यांनी नाव ठेवताना देवांनाही सोडलं नाही,” असा टोला पवारांनी लगावला.
पुण्यात आज सकाळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संजीवन उद्यानाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणेकरांच्या देवांना नावे ठेवण्याच्या शैलीबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, ” पुणेकरांची नावे ठेवण्याची एक खास शैली आहे. त्यांच्याकडून अनेक ठिकाणाची नावे ठेवण्यात आलेली आहेत. त्यांच्या पुणेरी पाट्या हा विषय कुतुहलाचाच आहे. खरच नावे ठेवण्यात पुणेकरांचा हात कुणी धरू शकत नाही. पुणेकरांनी नावे ठेवताना देवांनाही सोडलेले नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणेकर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच केलेल्या एका हटके आंदोलनाचीही सर्वत्र चांगलीच चर्चा होत आहे. त्यांनी औंध येथील मोदींच्या मंदिरात जाऊन तेथे दरवाढीविरोधात आरती करीत ती कमी करण्यासाठी साकडेही घातले होते.