शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदी आ. शंभूराज देसाई यांची निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत आघाडीवर असलेले पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली असून या निवडीबद्दल आमदार श्री. देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बंडखोरीत आ. शंभूराज देसाई हे आघाडीवर होते. आ. देसाई यांनी शिंदे गटाची बाजू माध्यमात भक्कमपणे कायम मांडली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटावर जोरदार प्रहार करत आले आहेत. बंडखोरीत आ. शहाजी पाटील यांना सोबत घेवून सुरतला पहिल्यांदा पोहोचले आमदार होते. तसेच बंडखोर आमदारांच्या गटातील महत्वपूर्ण भूमिका आ. देसाईंनी बजावली आहे.

फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,

मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझी शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड केल्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांची शिकवण यांच्याआधारे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष जनहित आणि जनसेवेसाठी कायम कटिबद्ध आहे, हा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो.