हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Desi Ghee vs Butter) आपण आपल्या आहारात काय खातो? याचा आपल्या आरोग्यावर विशेष परिणाम पडत असतो. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात आपल्या शरीराला आवश्यक असणारे प्रत्येक घटक असायला हवेत. म्हणूनच रोजच्या थाळीत पालेभाज्या, फळभाज्या, दही, फळे असे विविध पोषणदायी पदार्थ असावेत, असे तज्ञ सांगतात. आपल्यापैकी बरेच लोक आहारात देशी घी अर्थात तूप किंवा लोणी म्हणजेच बटरचा वापर करतात. अन्न शिजवताना किंवा खातेवेळी या पदार्थांचा वापरला जातो. यामुळे अन्नपदार्थांची चव वेगळी लागतेच. शिवाय या पदार्थांमध्ये असणारे काही महत्वाचे घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
पण आपल्या दैनंदिन आहारात देशी घी खाणे अधिक फायदेशीर आहे? की बटर? (Desi Ghee vs Butter) याविषयी कायम संभ्रम पहायला मिळतो. असं कन्फ्युजन तुमचंही होत असेल तर चिंता नसावी. आज आपण घी आणि बटर मधील फरक जाणून घेणार आहोत. त्यामुळे गरमा गरम भातावर घी खाणारे आणि पराठ्यावर मजबूत बटर लावून खाणाऱ्यांना कोणता पदार्थ अधिक आरोग्यदायी आहे हे ओळखणे सोपे जाईल. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना तूप आणि बटर एकच वाटत. पण तसं नाहीये बरं का… तूप आणि बटर हे दोन्ही पदार्थ वेगवेगळे आहेत. चला यामधील मुख्य फरक जाणून घेऊन त्यांचे फायदे पाहुयात.
देशी घी आणि बटरमध्ये काय फरक आहे?
अनेक लोकांना वाटतं की, घी आणि बटर या दोन पदार्थांमध्ये काहीच फरक नसून ते एकच आहेत. (Desi Ghee vs Butter) तर असं नाहीये. या दोन्ही पदार्थांमध्ये खूप फरक नसल्यामुळे हे कन्फ्युजन होत. घी व बटरमधला सगळ्यात मोठा आणि मुख्य फरक सांगायचा म्हणजे, घी बनवण्यासाठी दह्यापासून लोणी काढतात. ते लोणी वितळवलं जात आणि त्यापासून घी तयार होतं. चवीबद्दल सांगायचं तर, तुपाची चव खमंग आणि बटरची चव किंचित आंबट असते.
घी खाण्याचे फायदे काय?
असं म्हणतात की, देशी घी खाण्याचे खूप फायदे आहेत. कारण देशी घीमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे समाविष्ट असतात. जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. देशी घीचे नियमित सेवन केल्यास पचनसंस्थेशी संबंधित समस्या होत नाहीत. शिवाय ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या असेल त्यांनी आवर्जून देशी घीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. देशी घीमध्ये दाहक- विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे देशी काही खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. इतकेच नव्हे तर आयुर्वेदानुसार, देशी घीचे सेवन त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर असते.
(Desi Ghee vs Butter) घीमध्ये 120 kcal कॅलरीज, 14 ग्रॅम फॅट्स, 10 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स, 3.5 ग्रॅम मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, 0.5 ग्रॅम पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि 36 मिग्रॅ कोलेस्ट्रॉल असते.
बटर खाण्याचे फायदे काय?
बटर म्हणजे काय तर लोणी आणि लोणी दह्यापासून काढले जाते. जे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. बटरमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात कॅल्शियम शोषण्यास मदत होते. तसेच कॅल्शियमयुक्त बटरचे सेवन केल्यास हाड मजबूत होतात. (Desi Ghee vs Butter)
बटरमध्ये 102 kcal कॅलरीज, 11.5 ग्रॅम फॅट्स, 7 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स, 3 ग्रॅम मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, 0.4 ग्रॅम पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि 31 मिग्रॅ कोलेस्ट्रॉल असते.
आरोग्यासाठी देशी घी की बटर? (Desi Ghee vs Butter)
काही आहार तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, देशी घी आणि बटरमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. यामुळे हृदय विकाराचा धोका वाढतो. अशात जर दोन्ही पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात केले तर आणि तरच शरीराला फायदा होऊ शकत. यातही अधिक फायद्यांसाठी गवत खाणाऱ्या गाईचे घी वापरण्याचा सल्ला तज्ञ देतात.