देऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे निधन

0
55
Pranit Kulkarni
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – देऊळबंद या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक तसेच आ रा रा… खतरनाक…या गाण्याचे गीतकार प्रणीत कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत प्रणित कुलकर्णी यांच्या निधनाची माहिती देत भावूक पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे.

https://www.facebook.com/pravin.tarde.9/posts/4197977490223494

प्रविण तरडे यांची फेसबुक पोस्ट
माझा प्रणित दादा गेला… सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभु हरपला… गीतकार, लेखन, दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी बद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही. देवूळबंदला माझ्या सोबत लेखन, दिग्दर्शन आणि देवूळबंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीररावचा गितकार.. आ रा रा खतरनाक, उन उन वठातून, आभाळ आभाळ, गुरुचरीत्राचे कर पारायण, हंबीर तु खंबीर तु अशा एका पेक्षा एक गाणी लिहून प्रणीदादा गेला… कायमचा, अशा शब्दांमध्ये प्रविण तरडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रवीण तरडे यांचा मुळशी पॅटर्न हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटामध्ये नव्वदच्या दशकात महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचे झपाट्याने झालेले विस्तारीकरण आणि वाढणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे शहरावर व परिसरावर झालेल्या परिणामाची कथा मांडण्यात आली होती. या चित्रपटातील प्रणीत कुलकर्णी यांनी लिहिलेले आ रा रा… खतरनाक… हे गाणे मोठ्या प्रमाणात गाजले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here