महाविकास आघाडी की महायुती; कोणी केली जास्त विकास कामे? जाणून घ्या जनतेचा कौल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी दोन दिवसांवर येऊन पोहचलेल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या बाजूने जनतेला अनेक आश्वासन दिलेली आहे. आणि या आश्वासनांवरून नागरिकांनी आता महाविकास आघाडीचा काय कार्यकाल आणि महायुतीचा कार्यकाल यांची तुलना केलेली आहे.

महायुतीच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचा कार्यकाल अत्यंत चांगला असल्याचे म्हटले आहे. तसेच लोकांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्याकडूनही महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचा कार्यकाळात विकास कामे झालेली आहेत. अशी मते मांडलेली आहेत. महायुतीने राज्यांमध्ये अनेक विकास कामे केलेली आहेत. असे मत लोकांनी मांडलेले आहे. या दोन्ही पक्षांचा विचार केला, तर तुलनात्मक महायुतीच्या सरकारमध्ये राज्यात अनेक चांगले बदल घडवून आल्याचे समोर आलेले आहे

महायुतीने आणली योजनांना गती

2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. या सरकारला केवळ अडीच वर्षे मिळाले आहेत. परंतु या अडीच वर्षात त्यांनी विविध योजना आणलेल्या आहेत. या योजनांचा फायदा सारखा सर्वसामान्य नागरिकांना झालेला आहे. महिलांसाठी त्यांनी माझी लाडकी बहिणी योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्यातील दीड हजार रुपयांचा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मुलींसाठी उच्च मोफत शिक्षण केलेले आहे. लेक लाडकी योजना आणली आहे. महिलांना दरवर्षी तीन सिलेंडर मोफत देणाऱ्या अन्नपूर्णा योजनेची घोषणा देखील अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. परंतु महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात महिलांच्या कल्याणासाठी अशा कोणत्याही प्रकारची योजना आणलीनाही. तसेच महिलांचा जास्त विचार केला नाही, असे मत लोकांनी मांडलेले आहे.

शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी योजना

महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी किसान सन्मान योजना अंतर्गत दर महिन्याला पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच एका रुपयात पीक विमा मिळत आहे. तसेच कृषी वीज बिल देखील माफ करण्याची योजना शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने आणलेली आहे. मोफत विजेसाठी त्यांनी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तरुणांसाठी जॉब जॉब ट्रेनिंग सुविधा, सारथी बार्टी योजना तीन शिक्षण प्रशिक्षण उपलब्ध करून दिलेले आहे. लाडका भाऊ योजनेचा लाभ देखील दहा लाख तरुणांना मिळणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांच्या निवृत्ती वेतनाच्या रकमेत देखील महायुती सरकारने वाढ केलेली आहे. परंतु महाविकास आघाडी सत्तेत असताना अशा प्रकारची कोणतीही योजना झाली नाही.

नोकर भरती

माहिती सरकारने मागील दोन वर्षांमध्ये जवळपास 75000 सरकारी पदांसाठी भरती केलेली आहे. तसेच पेन्शन योजना चालू करण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविका तसेच कृषी सेविका यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात येत आहे. तसेच पोलीस कॉन्स्टेबल या पदाच्या तब्बल 18000 पदांची भरती देखील माहिती सरकारच्या काळात पूर्ण झालेली आहे.

उद्योजकांना चालना

रोजगाराच्या क्षेत्रात तरुणांना संधी दिलेली आहे. यावेळी माहिती सरकारने मराठा बांधवांसाठी अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळ सक्षम केलेले आहे. आणि यामध्ये एक लाखांपेक्षा जास्त उद्योजक घडवलेले आहेत. विविध रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगाराची संधी महायुतीच्या काळात मिळालेली आहे.

आरोग्य क्षेत्रात नव्या सुविधा

आरोग्य क्षेत्रात देखील महायुतीच्या काळात अनेक नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत. महायुती सरकारने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना आणलेला आहे. या अंतर्गत शेकडो आरोग्य केंद्र व रुग्णांची तपासणी मोफत केली जाते. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून विमा संरक्षणाची रक्कम ही दीड लाख रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत केली आहे.

नैसर्गिक आपत्तीत मदत

महायुती सरकारने आदिवासी बांधवांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राबवलेली आहे. महाविकास आघाडीच्या काळात 18119 घरांसाठी 447 रुपये मंजूर केले होते. तर महायुतीच्या काळात 1 लाख 25 हजार 700 घरांसाठी तब्बल 771 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यावर महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना 8 71 कोटी रुपयांची मदत केली होती. तर महायुतीच्या काळात ही रक्कम 1 लाख 63 हजार 9 कोटी रुपयांवर गेलेली होती. महाविकास आघाडीने त्यांच्या काळात बचत गटांना 13941 कोटी रुपयांची मदत केली होती. तर महायुतीच्या काळात 28,811 कोटी रुपयांची मदत करण्यात आलेली आहे.

रोजगार मिळावे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अंतर्गत महाविकास आघाडीने 2718 कोटी रुपये मंजूर केले होते. तर महायुतीने ही रक्कम 4 हजार 108 कोटी रुपये मंजूर केलेले होते. महाविकास आघाडीच्या काळात एमएसएमइ वार्षिक सरासरी 810 हजार होती. ती वाढून महायुतीच्या काळात 14 लाख 41 हजार रुपयांपर्यंत पोहोचली. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात 396 रोजगार मिळावे घेण्यात आले. आणि 36000 तरुणांना रोजगार मिळाला. तर महायुतीच्या काळात 10138 मिळावे घेण्यात आले. आणि याद्वारे 1 लाख 51 हजार तरुणांना नोकरीच्या संधी मिळाल्याचा दावा करण्यात आलेला आहे.