Sunday, May 28, 2023

विडणीला कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा उद्या शुभारंभ : सागर अभंग

फलटण प्रतिनिधी। अनमोल जगताप
विडणी ग्रामपंचायतीमध्ये नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांगीण विकासाचे पर्व सुरु केले असून त्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांचे आशिर्वाद आणि भक्कम पाठबळ लाभल्याने आगामी काळात विडणी विकासाच्या वाटेवर अग्रभागी नेणार याची ग्वाही लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी दिली आहे.

उद्या शुक्रवार (दि. 3) मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता विडणी येथे ग्रामपंचायत माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची भूमिपूजने व प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ होणार आहे. विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर कांतीलाल अभंग यांनी सरपंचपद स्वीकारल्यानंतर ग्रामस्थांच्या अडचणी, अपेक्षा, मागणी यासर्व बाबींचा विचार केला आणि या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन कामाचे प्रस्ताव तयार करुन त्यासाठी निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले. खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांचे मार्गदर्शनाखाली शासन स्तरावर निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजनांमधून अनेक विकास कामे मंजूर करुन दिल्याने निधीची तरतूदही झाली असल्याचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

विकासकामांचा समावेश पुढीलप्रमाणेः- केंद्रीय पेय जल योजना 32 कोटी 80 लाख रुपये, मोडू ते राजाळे रस्ता डांबरीकरण 2 कोटी 80 लाख रुपये, आसू रोड ते काळुखे वस्ती रस्ता खडीकरण करणे (1.5 कि.मी.), आसू रोड ते काळुखे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे 5 लाख रुपये, मोडूकाई मंदिर ते दहाबिघे – टिळेकर वस्ती खडीकरण (1.5 कि. मी.), 24 फाटा ते मिलिंद नाळे वस्ती रस्ता डांबरीकरण 7 लाख रुपये, मोडूकाई मंदिर ते 25 फाटा रस्ता खडीकरण 2 कि. मी., जिल्हा परिषद शाळा 6 मॉडर्न शौचालय 36 लाख रुपये, दंडीले मळा ते राऊतवाडी रस्ता काँक्रीटीकरण 15 लाख रुपये, विडणी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 10 लाख रुपये, पंढरपूर रोड ते इंगळे – कदम वस्ती रस्ता डांबरीकरण 10 लाख रुपये, आगवणे वस्ती पेव्हर ब्लॉक बसविणे 5 लाख रुपये, मांगोबा माळ समाज मंदिर सुशोभीकरण 4 लाख रुपये, बौद्ध नगर अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 10 लाख रुपये, बौद्ध नगर अंगणवाडी नवीन इमारत 11.50 लाख रुपये, आदलिंगे वस्ती नवीन अंगणवाडी इमारत 11.50 लाख रुपये, टिळेकर वस्ती ते शिनगारे वस्ती रस्ता डांबरीकरण 7 लाख रुपये, आसू रोड ते आदलिंगे वस्ती रस्ता काँक्रीटीकरण 20 लाख रुपये, आदलिंगे वस्ती ते गुलाब पदु अभंग वस्ती रस्ता खडीकरण 1 कि. मी., तळवली ते अभंग वस्ती – पवार वस्ती रस्ता खडीकरण 2 कि. मी.,जानूबाई मंदिर ते ज्योतिबा मंदिर विद्यानगर परिसर पेव्हर ब्लॉक 10 लाख रुपये, जयभवानी मंदिर, ननावरे वस्ती परिसर पेव्हर ब्लॉक 5 लाख रुपये.