हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत 25 आमदारांसह गुजरात गाठले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मोठं विधान केले आहे. सरकारला कुठलाही धोका नाही, सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलाय अस ते म्हणाले.
देवेंद्र भुयार म्हणाले, एकनाथ शिंदे हे साधे सरळ आणि प्रामाणिक नेते आहेत. सर्वांचे प्रश्न ते सोडवतात. आनंद दिघे यांचे ते शिष्य आहेत. गद्दारी त्यांचा रक्तात नाही. ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत. सरकारला यामुळे कोणताही धोका नाही. कारण महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार सिल्वर ओकवर आहेत, असं त्यांनी म्हंटल.
महाराष्ट्र चे नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात सुरक्षित आहे पण त्यांनी आमदारांना वेळ द्यावा असेही देवेंद्र भुयार यांनी म्हंटल. तसेच विधानपरिषद निवडणूकीत शिवसेनेला त्यांच्यात आमदारांची 3 मते कमी पडली त्यावर बोलताना भुयार यांनी संजय राऊत याना टोला लगावला. राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी आम्ही मतदान केलं नसल्याचा आरोप केला. या विधानपरिषदेत आता त्यांच्याच पक्षातील तीन नेत्यांनी मतदान केलं नाहीये. आता संजय राऊत काय निर्णय घेतील हे मला बघायचं आहे अस त्यांनी म्हंटल.