वाढत्या वजनामुळं फडणवीसांनी टाळला रबडी, कुल्फीचा मोह; नेमका काय आहे किस्सा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढत्या वजनामुळं एका कार्यक्रमात मनावर दगड ठेवत रबडी, कुल्फीचा मोह टाळला. याबाबतची जाहीर कबुली खुद्द फडणवीस यांनी एका कार्यक्रमात दिली. ही घटना आहे पिंपरी-चिंचवडमधील.

आज पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या इंद्रायणी थडी जत्रेचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. जत्रा म्हटलं कि, खाण्यापिण्याच्या पदार्थांची रेलचेल आलीचं. आमदार लांडगे यांनी आयोजित केलेली जत्रा सुद्धा त्याला अपवाद नव्हती. कुल्फी, रबडीसारख्या अनेक पदार्थांचे स्टॉल या जत्रेत असल्याचे उद्घाटनावेळी फडणवीस यांना पाहिलं. दरम्यान, यावेळी फडणवीस यांनी केलेल्या भाषणात आपल्याला व्यासपीठासमोरील कुल्फी, रबडीसारखे स्टॉल खुणावत असल्याचं म्हटलं. परंतु आपण त्या ठिकाणी जाणार नसून आपल्याला डायटिंग करायचं असल्याचं म्हणताच उपस्थितीतांत एकच हशा पिकाला.

फडणवीसांनी डिटिंगचं घेतलं मनावर; नेमकं काय म्हणाले
”आम्हाला व्यासपीठावर बसवून ठेवलं आहे आणि समोर स्पेशल कुल्फी, रबडी अस लिहिलेलं आहे. हे सर्व स्टॉल खुणावत आहेत. मात्र, आज काय त्या स्टॉलकडे जाणार नाही. तसंही त्या स्टॉलकडे तुम्ही (महेश लांडगे) आणि मी जाण योग्य नाही. दोघांनाही डायटिंग करायचं आहे, तुम्ही पैलवान आहात मी नाही. तुमची कमावलेलं शरीर आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

पेट्रोल डिझेलच्या किंमती घसरल्या; घसरलेले दर

मोठी बातमी : लाखो लोकांचे PF खाते ब्लॉक, तुमचे खाते ब्लॉक केले की नाही असे करा चेक

नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे एकाच विचारधारेचे – राहुल गांधी