पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, बिहारमध्ये भाजपने मोठं संघटन उभारलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक प्रभारी म्हणून ज्या प्रकारे प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
“बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपनं संघटन उभारलं आणि पाच वर्षांत जे काम झालं. त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो आहे. एनडीएला जनतेने भरभरून मते दिली आहेत. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून येत आहे.” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
याशिवाय “विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं. त्यामुळे हे देवेंद्र फडणवीस यांचंही यश आणि विजय आहे”, असं आमदार प्रसाद लाड म्हणाले. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. सध्या येत असलेल्या कलानुसार भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे. तिथे फडणवीसांच्या प्रचाराचा आम्हाला फायदा झाला, असं वक्तव्य बिहार (Bihar) भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय टायगर यांनी केलं आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल काही तासांत स्पष्ट होतील. मतमोजणी अजूनही सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या भाजप 75 जागांवर आघाडीवर आहे. एवढेच नव्हे तर भाजप आपला मित्रपक्ष असेलेल्या जदयूच्याही पुढे असल्याचं दिसतंय. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, थोडा वेळ वाट पाहा. बिहारमध्ये महागठबंधनलाच स्पष्ट बहुमत मिळणार असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी केला आहे.
Big Breaking News
निकाल काही असो! भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष; सत्ता आल्यास नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणार का?
वाचा सविस्तर-👉 https://t.co/bvwFbXUfI1@NitishKumar @BJP4Maharashtra @RJDforIndia #BiharElectionResults #BiharElection2020— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 10, 2020
Bihar Election Result 2020: मोदींच्या हनुमानाचा जेडीयूला दणका! चिराग पासवान नितीश कुमारांना बुडवणार?
वाचा सविस्तर-👉 https://t.co/SDFVaVoaX2@chiragpaswan @NitishKumar @RJDforIndia @yadavtejashwi @laluprasadrjd @NitishKumar— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 10, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in