हीच का तुमची लोकशाही ? ; जेपी नड्डा यांच्यावरील हल्ल्याचा फडणवीसांकडून निषेध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पुढील वर्षात होणार्‍या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात तीव्र विरोध होत आहे. जेपी नड्डा आणि कैलास विजयवर्गीय आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला जात असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूने त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आहे.

या हल्ल्याचा तीव्र निषेध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून या हल्ल्याचा निषेध केला आहे. आमच्या राष्ट्रीय पातळीवरील नेते जेपी नड्डा आणि कैलास विजयवर्गीय यांच्यावरील हल्ला केल्याचे म्हणत, लोकशाहीमध्ये अशी कृत्ये करणाऱ्यांची आम्ही निंदा करतो, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच हा हल्ला करणाऱ्यांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला करत हीच का तुमची लोकशाही असा सवाल केला आहे. तसेच लोकशाहीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला निंदनीय असल्याचे म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’