अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही; फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे

फडणवीस म्हणाले, शाई फेक करणे पूर्णपणे चुकीचा आहे. साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचं केंद्र असतात. तुम्हाला दुसरी अभिव्यक्ती करायचे होते तर तुम्हाला कुठेही करता येते. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे हे योग्य नाही अशा शब्दांत फडणवीसांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकावर आक्षेप घेत शाईफेक करण्यात आली. या घटनेमुळे साहित्य संमेलनात मोठी खळबळ उडाली. गिरीश कुबेर यांच्यावर केलेल्या या शाईफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

You might also like