वाझेंच्या आरोपाची चौकशी करून दूध का दूध पानी का पानी व्हावं; फडणवीसांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब मुळे राज्यात अजून एक खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर विचार करायला लावणारा आहे. पत्राची चौकशी होऊन ‘दूध का दूध पानी का पानी’ व्हावं” अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात दोन कोटी आणि 50 कोटीचा उल्लेख आहे. हा मजकूर विचार करायला लावणारा आहे. महाराष्ट्रात घडतंय ते राज्याच्या आणि पोलिसांच्याही प्रतिमेसाठी चांगलं नाहीत. वाझेंच्या आरोपांची सीबीआय किंवा तत्सम तपास यंत्रणांकडून चौकशी करावी. “दूध का दूध पानी का पानी” व्हावं, सत्य बाहेर यावं, अन्यथा पोलिसांची डागाळलेली प्रतिमा कधीच सुधारणार नाही” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, राज्य सरकारने लसीकरणाचं राजकारण बंद केलं पाहिजे. यासंदर्भात जे टीका करतात त्यांनी बघितलं पाहिजे की उत्तर प्रदेशपेक्षा जास्त लोकसंख्या असूनही उत्तर प्रदेशपेक्षा जास्त लसी राज्याला मिळाल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. राज्याला किती लसी दिल्या, किती वापरात आल्या हे सगळं मंत्र्यांनी सांगितलं आहे,’ असं म्हणत फडणवीसांनी राज्य सरकारला फटकारलं आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like