हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकार नाकर्तेपणा दाखवत आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. मात्र, तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आगामी काळात मनसेला सोबत घेणार नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरभाष्य केले. चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया फडनवीसांनी दिली. तसेच राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असं खुलं आव्हानही दिलं आहे. शिवेसना खासदार संजय राऊत टीका करण्याशिवाय दुसरं काय करणार, असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षकमतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अवकाळी पाऊसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत, निसर्ग चक्रीवादळ, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई, निसर्ग चक्रीवादळ आणि वाढीव वीजबिलांवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’