Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार? महाराष्ट्राची सूत्रे कोणाकडे?

Devendra Fadnavis BJP National President
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे आता आपल्याला दिल्लीच्या राजकारणात पाहायला मिळू शकतात. फडणवीस यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येईल अशा चर्चा सुरु आहेत. पक्षाच्या हायकमांडने भाजपच्या राष्ट्रीय (BJP National President) अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. फडणवीस येत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नवी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतची बातमी दिली आहे. फडणवीस दिल्लीला गेल्यावर विनोद तावडे यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा देण्यात येईल असेही बोललं जातंय.

संघाचाही देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा- Devendra Fadnavis

काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत नीती आयोगाची बैठक झाली होती. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर मोदींनी फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली, यानंतरच फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा चर्चाना उधाण आलं आहे. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांचा पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ काही आठवड्यांपूर्वीच संपुष्टात आला असून त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरु आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रेसर आहे. फडणवीस यांचा कामाचा आवाक, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून उत्तमपणे सांभाळलेली जबाबदारी, यामुळे फडणवीस यांच्या नावाला पसंती आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठिंबा आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झालं आहे. फडणवीस येत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नवी दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र येत्या ३ महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत त्यामुळे विधानसभेची निवडणूक संपेपर्यंत फडणवीस महाराष्ट्रातच राहावे आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हातात घ्यावी असाही एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. परंत्तू, सध्याची दिल्लीतील गरज पाहता फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच दिल्लीला जाऊ शकतात. फडणवीस दिल्लीच्या राजकारणात गेल्यास महाराष्ट्र भाजपची धुरा विनोद तावडे यांच्या खांद्यावर जाण्याची शक्यता आहे मात्र याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.