विठ्ठलाची पूजा 100 टक्के देवेंद्र फडणवीसच करतील – आ. शिवेंद्रराजे 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी देखील यंदाच्या आषाढी वारीच्या एकादशीची पूजा देवेंद्र फडणवीस करतील असे सूचक वक्तव्य केले होते. यावर आता भाजपचे सातारा- जावली मतदार संघाचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, विठ्ठलाची पूजा 100 टक्के देवेंद्र फडणवीसच करतील.

राज्यात सुरू असलेल्या राजकीय भूकंपामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. बंडखोर आमदारांनी शिवसेनेने काॅंग्रेस- राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपला साथ देण्याची अट घातली आहे. येणाऱ्या काळात भाजपचे सरकार येण्यार हे जवळपास निश्चित झाले आहे. या घडामोडीमुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसतील तेही, लवकरच अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मी गेले दोन दिवस झाले अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेमुळे साताऱ्यातच आहे. सध्यातरी मला कोणताही निरोप आलेला नाही, पक्षाने मुंबईला यायच्या सूचना दिल्यास मी नक्की जाईन. माझा मंत्री पदासाठी कोणतीही बोलणी झालेली नाही, मात्र पक्षातील वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आमदार म्हणून मान्य असेल.