हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कडून भाजप विरोधात सायकल आंदोलन करण्यात आले होते. अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असे फलक हातात घेऊन काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. दरम्यान नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला
देशातील सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. केंद्र सरकारचा एकूण टॅक्स 32 रुपये आहे. राज्य सरकारनं 27 रुपये टॅक्स पेट्रोलवर लावला आहे. नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसला विरोधी पक्षांची जागा घेता येणार नाही. देशात काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे, अशा अवस्थेत मीडिया इवेंट ते करत आहेत. असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.
अजित पवार अर्थसंकल्प मांडताना पेट्रोलवरचे राज्य सरकारचे काही टॅक्स कमी करून दर कमी करणार आहेत असं दिसतंय. त्यामुळे त्याचं श्रेय घेण्यासाठी काँग्रेसकडून आधीच हा सायकल मोर्चा काढण्यात आला. पण राज्यात विरोधी पक्षाची जागा काँग्रेसला घेता येणार नाही. काँग्रेसचं देशातही विरोधी पक्ष म्हणून स्थान नाही. एकूणच काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे. या अवस्थेत त्यांना मीडिया इव्हेंट करावा लागणारच. तो ते करत आहेत”, असा टोला फडणवीसांनी लावला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’