मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतेय; JEE-NEET परीक्षेवरून धनंजय मुंडेंची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना काळात JEE (main) आणि NEET-UG-2020 परीक्षा घेण्यावरुन सध्या केंद्र सरकारवर विद्यार्थी आणि पालक याशिवाय समाजाच्या विविध स्तरातून टीका होत आहे. वारंवार विनंत्या करूनही परीक्षा ठरल्या वेळेतच होणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या JEE/NEET परीक्षा घेणं म्हणजे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी खेळण्यासारखं आहे अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी मोदी सरकारवर केली आहे.

JEE-NEET परीक्षा रद्द करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “कोरोना या महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या JEE/NEET परीक्षा घेणं म्हणजे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी खेळण्यासारखं आहे. केंद्र सरकारने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा असा माझा आग्रह आहे.”

दरम्यान, JEE (main) परीक्षेसाठी ऍडमिट कार्ड जारी करण्यात आली आहेत. आता NEET-UG-2020 परीक्षेचेही ऍडमिट कार्ड लवकरच जारी करण्यात येणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजेन्सी अर्थात एनटीएने, 99 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं, सोयीनुसार परीक्षा केंद्र मिळावं असं सांगितलं आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता. विद्यार्थ्यांना कोरोना काळात प्राधान्याने त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रांचा पर्याय निवडावा लागला. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, 99 टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीच्या आधारे परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. परीक्षांची अधिकृत माहिती देताना एनटीएने सांगतिलं की, जेईई आणि नीट परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”