धनंजय मुंडे आज राजीनामा देणार? त्या दाव्यामुळे चर्चांना उधाण

0
84
dhananjay munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या आणि मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे (Facebook Post) चर्चांना उधान आले आहे.

करुणा शर्मा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टदमध्ये दावा केला आहे की, अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला आहे. मुंडे यांनी यापूर्वीच कबूल केले होते की, वाल्मिक कराड दोषी आढळल्यास ते स्वतः पदाचा राजीनामा देतील. त्यामुळे येत्या विधीमंडळ अधिवेशनाच्या आधीच त्यांचा राजीनामा निश्चित असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हणले आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्याने आता विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यामध्येच मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीचा विश्वासू सहकारी गंभीर गुन्ह्यात अडकला असल्याने नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी पदावर राहू नये, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तर, करुणा शर्मा यांनी हा मुद्दा उचलून धरत याप्रकरणी तातडीने कठोर निर्णय घेतला जावा, असे मत व्यक्त केले आहे.

https://www.facebook.com/100076329335712/posts/pfbid02kaRYFVznGZyiqFK5tribF3YmxAzwWWqyNBu9Tk5UNwPWqqH89pc3DUCZ38qqBi68l/?app=fbl

फाशीची मागणी

या संपूर्ण घटनेबाबत करुणा शर्मा यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत दोषींना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत अमानुष पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे दोषींना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. धनंजय मुंडे यांनीही यापूर्वीच जाहीरपणे सांगितले होते की, आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी. त्यामुळे आता न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने होऊन आरोपींना योग्य शिक्षा व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे.

महत्वाचे म्हणजे, सोमवारपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. याआधीच धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र तसे झाले नाही. पण आता करुणा शर्मा यांनी दावा केला आहे की, अजित पवार हे मुंडे यांना मंत्रिमंडळाबाहेर करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा राजकीय घडामोडींकडे लागल्या आहेत.