बीड प्रतिनिधी । परळीतील धनंजय विरुद्ध पंकजा लढतीवर सर्व राज्याचे लक्ष लागलेले असताना धनंजय यांनी मतमोजणीत मोठी आघाडी घेत विजय मिळवला आहे. आघाडीतून धनंजय मुंडे विजयी झाल्याने राष्ट्रवादी समर्थक विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत. धनंजय मुंडे यांनी सुरवातीपासूनच मतांची आघाडी घेत पंकजा मुंढेंना पिछाडीवर टाकले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित होता त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुरवातीपासूनच विजय साजरा करण्यास सुरवात केली होती.
परळीतील निवडणूक बहीण- भावाने प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे दिवंगत नेते आणि वडील गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या पंकजांची राजकीय प्रतिष्ठ पणाला लागली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीत आपला दबदबा निर्माण केलेले आणि विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु आता धनंजय यांनी विजय मिळवत स्वतःच नेतृत्व सिद्ध करून दाखवलं आहे.
निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात या बहीण-भावांनी मतदारांना भावनीक आवाहन केलं. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. बहीण-भावात कोण बाजी मारणार याची फक्त परळीकरांनाच नव्हे संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली होती. मात्र मतमोजणीला सुरवात झाल्यापासूनच धनंजय यांनी बाजी मारत विजय प्रस्थापित केला आहे.
धनंजय मुंडे – 68351
पंकजा मुंडे – 44105
एकूण मतदान – 119570
परळी चौदावी फेरी अखेर …. धनंजय मुंडे 26422 मतांनी आघाडीवर
धनंजय मुंडे – 73639
पंकजा मुंडे – 47223
एकूण मतदान – 128275
परळी पंधरावी फेरी अखेर 26195 धनंजय मुंडे मतांनी आघाडीवर
धनंजय मुंडे – 78070
पंकजा मुंडे – 51875
एकूण मतदान – 137811
परळी सोळावी फेरी अखेर धनंजय मुंडे 27036 मतांनी आघाडीवर
धनंजय मुंडे – 83363
पंकजा मुंडे – 56327
एकूण मतदान – 147964
परळी सतरावी फेरी अखेर धनंजय मुंडे 28116 मतांनी आघाडीवर
धनंजय मुंडे – 87638
पंकजा मुंडे – 59522
एकूण मतदान – 156333