हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dhanlaxmi Bank : RBI ने रेपो दरात नुकतीच वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. यादरम्यान आता Dhanlaxmi Bank ने देखील आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे.
नवीन दर 25 ऑगस्ट 2022 पासून लागू
Dhanlaxmi Bank कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. हे लक्षात घ्या कि, हे नवीन दर 25 ऑगस्ट 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. हे नवीन दर बँकेकडून 1 ते 10 वर्षांच्या FD वर वाढवण्यात आले आहेत.
Dhanlaxmi Bank चे एफडी दर (2 कोटी रुपयांपेक्षा कमी)
7-14 दिवस – 3.25 टक्के
15-45 दिवस – 3.25 टक्के
46-60 दिवस – 3.75 टक्के
61-90 दिवस – 3.75 टक्के
91-179 दिवस – 4.50 टक्के
180 दिवस – 4.50 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षे – 5.60 टक्के
555 दिवस – 6.00 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षे – 5.60 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षे – 6.00 टक्के
1111 दिवस – 6.10 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे – 6.00 टक्के
ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदर
हे लक्षात असू द्यात कि, Dhanlaxmi Bank कडून आता ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज दिले जात आहे. या अंतर्गत आता बँक सर्व कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याजदर देईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dhanbank.com/interest-rates/
हे पण वाचा :
Business Idea : वर्षभर मागणी असलेल्या ‘या’ ड्रायफूटची लागवड करून मिळवा करोडो रुपये !!!
Post Office च्या ‘या’ विमा पॉलिसीमध्ये 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचे विमा संरक्षण !!
Bank Holidays : सप्टेंबरमध्ये बँका 13 दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट पहा !!!
Gold Price Today : सोने-चांदी पुन्हा महागले, आजचा भाव पहा
Multibagger Stock : गेल्या 6 महिन्यांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा नफा !!!