अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन पडले; जेजे रुग्णालयात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 100 कोटी वसुलीच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आज कारागृहात चक्कर येऊन पडल्याची घटना घडली आहे. यानंतर देशमुखांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांचा रक्तदाब वाढल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजताची ही घटना आहे. जेलमध्ये असताना अनिल देशमुख यांच्या छातीत दुखू लागले. त्याच दरम्यान ते चक्कर येऊन पडले. तुरुंगातील अधिकाऱ्यांनी तत्काळ डॉक्टरांना पाचारण केलं. मात्र त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. देशमुख यांना आणखी काही दिवस जेजे रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे गृहमंत्री होते. मात्र, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करत खळबळ उडवून दिली. यानंतर देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच त्यांना ईडीने अटकही केली त्यानंतर आजपर्यंत देशमुख तुरुंगातच आहेत.