सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरातील महत्वाच्या असलेल्या पोवई नाक्यावरील शिवतिर्थाचं काम गेल्या ३ वर्षांपासुन रखडले आहे. या रखडलेल्या कामाचा आज धर्मवीर युवा मंचच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रविकांत आंबेकर यांना गाजर देवुन निषेध करण्यात आला. यावेळी बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या अधिका-यांनी शिवजयंती पर्यन्त काम न केल्यास मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा धर्मवीर मंचच्या वतीने प्रशांत नलावडे यांनी दिला आहे.
यावेळी धर्मवीर मंचचे प्रशांत नलावडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या ३ वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या शिवतिर्थाच काम अपुर्ण आहे. मात्र, बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद या दोन्ही विभागांच्या गैरसमजामुळे जबाबदारी एकमेकांवर ढकलायचं काम करत आहेत. राजधानीचं ठिकाण हे सातारा आहे अस असताना या ठिकाणचे शिवतिर्थाच काम न होणे हे निषेधार्य आहे.
सातारा शहरातील महत्वाच्या या शिवतीर्थच्या कामाकडे सातारा शहरातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा लक्ष घालणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधिमी लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शिवजयंती पर्यंत शिवतिर्थाचे काम न केल्यास मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा नलावडे यांनी यावेळी दिला आहे.