हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Dharmendra Passed Away । बॉलिवूडचा (Bollywood) ‘ही-मॅन’ (He Man) सुपरस्टार, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते प्रकृतीच्या विविध समस्यांशी सामना करत होते. अखेर 24 नोव्हेंबरच्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या प्रकृती अस्वास्थापासूनच वेगवेगळ्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या. अनेक अफवाही पसरलेल्या होत्या, परंतु IANSने त्यांच्या निधनाची पुष्टी केली असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना शेवटी पूर्णविराम मिळाला आहे. येत्या 8 डिसेंबर रोजी ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार होते. त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
काही दिवसांपासून तब्ब्येत बिघडली – Dharmendra Passed Away
धर्मेंद्र हे 89 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुन्हा घरी हलवण्यात आले. त्यांच्यावर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु अखेर त्यांनी अंतिम श्वास घेतला Dharmendra Passed Away. धर्मेंद्र यांच्या जाण्याने देओल कुटुंब दु:खात बुडाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. या खोट्या बातम्यांमुळे कुटुंबाने नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता खरी दुःखद घटना घडल्याने कुटुंबीय काहीही बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे समजते.
चाहते मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्यांच्या आठवणी, फोटो आणि त्यांचे संवाद शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. धर्मेंद्र यांच्या घराच्या बाहेरून आलेल्या एका व्हिडिओमुळे चाहत्यांत आधीच काळजीची भावना निर्माण झाली होती. त्या व्हिडिओत एम्ब्युलन्स घराबाहेर उभी असल्याचे दिसत होते. तसेच श्मशानभूमीच्या बाहेर अचानक वाढलेली सुरक्षा पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण झाली होती. अखेर अधिकृत घोषणा येताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले.
धर्मेंद्र हे बॉलीवूडचे बडे अभिनेते –
भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘पत्थर’ आणि ‘घायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. चा ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.




