परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
परभणी जिल्हात अवकाळी पाऊस परिस्थितीने अधूनमधून पडत असलेल्या पावसाने काल सायंकाळपासून धुके पडत आहे. आज पहाटेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये धुक्याची चादर पसरली होती त्यामुळे जवळच दिसणेही दुरापास्त झालं होतं .
आज पहाटे मात्र गुलाबी थंडी, दाट धुके असे मनमोहक वातावरण तयार झाल्याने नागरिकांनी गुलाबी थंडीचा आनंद घेतला.काल पासून पडणाऱ्या थंडीने जिल्हात ठिकठिकाणी शेकोट्या चा आधार घावा लागत आहे . सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकाना धुक्यामुळे कसरत करत वाट काढावी लागली, तरी
दरम्यान सततच्या धुक्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता वाढल्या आहेत. या धुक्यांमुळे उभा असलेला कापूस ओलसर होत आहे तर तुर, आणि हरभरा आणि ज्वारी आदी पिकांना मोठा फटका बसणार आहे. फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात फूल व फळगळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतातील बांधावर जाळ करतात धुके हटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अजून दोन-तीन दिवस असे धुके राहण्याची शक्यता आहे.