Diabetes Control Tips | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजार होतात. अशातच आजकाल मधुमेह (Diabetes Control Tips) होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक लोकांना मधुमेहाची समस्या उद्भवत असते. मधुमेहामध्ये आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. आणि आपल्याला इन्सुलिनची कमतरता पडते. या आजारावर कोणताही इलाज उपलब्ध नाही. हा आजार आपण केवळ नियंत्रणात ठेवू शकतो, जर आपण योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले तर या गंभीर समस्येला आपण नक्कीच सामोरे जाऊ शकतो. यासाठी तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून तुम्ही मधुमेह नियंत्रित करणे खूप गरजेचे आहे. आता मधुमेह नियंत्रित करण्यासाठी, तर आपल्या जीवनशैलीत काय बदल करावे ? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
संतुलित आहार | Diabetes Control Tips
तुम्ही दैनंदिन जीवनात संतुलित आहार घेतला पाहिजे. यामध्ये कर्बोदके, प्रथिने, फॅक्ट्स यांसारखे सगळे पोषक तत्वे योग्य प्रमाणात असले पाहिजे. तरच तुमच्या मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.
जास्त फायबर
तुमच्या शरीरातील फायबर हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी मदत करत असतो. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्य ही फायबरचे खूप चांगले स्त्रोत आहेत. त्यामुळे तुम्ही आहारात फायबरचा समावेश करणे गरजेचे आहे.
साखरेचा मर्यादित वापर
जास्त साखर खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. त्यामुळे मिठाई, ज्यूस त्याचप्रमाणे इतर गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात खा. नैसर्गिकरित्या ज्या फळांमध्ये साखर असते. ती फळे खाल्ली तर चालतात. परंतु अतिरिक्त साखर खाल्ल्याने मधुमेहाचा त्रास जास्त वाढतो.
जेवणाची वेळ
तुम्ही जर वेळेवर जेवण केले, तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहू शकते. रात्री जर तुम्ही कोणत्याही वेळी जेवण केले, तरीदेखील तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता असते.
व्यायाम | Diabetes Control Tips
आपल्या शरीरासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान 30 मिनिटे तरी व्यायाम करा. तुम्ही चालणे, पोहणे, सायकलिंग, योगा या प्रकारे कोणताही व्यायाम करू शकता.जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास असेल तर व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांची संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी तुमचे वजन नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या शरीराला पाहिजे तेवढ्याच कॅलरीचे सेवन करा. जर तुमच्या शरीरातील अधिक कॅलरी तुम्हाला कमी करायची असेल, तर तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्रिय असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही रोज व्यायाम केला पाहिजे. जिने चढणे. सायकलिंग करणे या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमच्या मधुमेहावर नियंत्रित राहील.