Diabetes Treatment | आजकाल लोकांचे जीवनशैली बदलल्यामुळे अनेक आजार देखील होत आहे. त्यात मधुमेह हा आजार आज काल प्रत्येक वयोगटातील लोकांना होत आहे. त्याचप्रमाणे ज्या लोकांना मधुमेह होतो, त्या रुग्णांना जर काही जखमा झाल्या, तर त्या लवकर बऱ्या होत नाही. त्याचप्रमाणे यावर जास्त काही उपचार देखील उपलब्ध नाही आहे. जागतिक पातळीवर ही एक मोठी वैद्यकीय समस्या बनलेली आहे. परंतु आता मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता पुण्यात असणाऱ्या कंपनीच्या नवीन औषधाला डायबेटिक फूट अल्सरच्या उपचारासाठी आता मंजुरी दिलेली आहे. पुणे स्थित नोव्हालीड फार्मा कंपनीचे एकच अधिकार प्राप्त हे एक नवीन औषध आहे. हे औषध हृदयविकारासाठी वापरत आहे.
डायबेटिक फूट अल्सर या उपचारासाठी आता देशांतर्गत बाजारपेठेसाठी ही औषधे नियंत्रण संस्थेकडून वितरणासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही औषधे आता मधुमेहाच्या रुग्णांच्या पायाला आणि पावलांना काही जखमा झाल्या, तर त्या पूर्णपणे बरे करू शकतात. अनेक वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून हे औषध बनवण्यात आलेले आहे.
याबद्दलची माहिती नोव्हालीड फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रीत देशपांडे यांनी दिलेले आहे. त्यांनी सांगितलेले आहे की, मधुमेह रुग्णांपैकी 15 ते 25 टक्के रुग्णांना एकदा तरी डायबिटीस फूट अल्सरचा त्रास होतो. परंतु या अशा जखमा बऱ्या न झाल्यामुळे त्यांना काही भाग गमवावा लागतो. भारतात दरवर्षी अशी लाखो प्रकरणासमोर येत आहेत. परंतु आता या जगात जखमा बऱ्या करणाऱ्या या औषधाला देखील मान्यता मिळालेली आहे.