हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मधुमेह (Diabetes) असणाऱ्या रूग्णांनी आपल्या आरोग्याची आणि खाण्यापिण्याची अतिशय काळजी घ्यावी लागते. कारण, या गोष्टींमध्ये थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी साखरेची पातळी झटक्यात वाढते. परंतु अशा व्यक्तींना आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवायची असेल तर त्यांनी गव्हाऐवजी पुढे देण्यात आलेल्या पिठाच्या भाकरी खाव्यात. या पिठाच्या भाकरी खाल्ल्यानंतर साखरेची नियंत्रित राहील. (Sugar Control Tips)
नाचणीची भाकरी – नाचणीच्या पिठामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्याचबरोबर यामध्ये फायबरचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामुळे ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे त्यांनी आहारात नाचणीची भाकरी खावी. यामुळे साखरेची पातळी नेहमी नियंत्रणात राहील. तसेच शरीराला पोषक तत्वे देखील मिळतील.
बाजरीची भाकरी – बाजरीची भाकरी डायबिटीज असणाऱ्या रुग्णांसाठी अति फायदेशीर ठरते. बाजरीच्या पिठामध्ये अनेक पोषक गुणधर्म असल्यामुळे याचा थेट फायदा शरीराला होतो. तसेच बाजरीच्या भाकरीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असल्यामुळे साखरेचे पातळी नियंत्रणात राहते. याबरोबर वजन देखील वाढत नाही.
ज्वारीची भाकरी – ज्वारीच्या भाकरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. तसेच ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहण्यात मदत होते. डायबिटीज ऐवजी इतर व्यक्तींनी देखील ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांच्या आरोग्याला लाभदायी ठरते.