हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मधुमेह असणाऱ्या रुग्णांना (Diabetic Patients) आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी लागते. या रुग्णांना आपल्या आहारात आणि जीवनशैलीत कोणतेही बदल करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागतो. कारण त्यांच्याकडून घडलेल्या एका चुकीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच आजच्या या लेखात आम्ही मधुमेहाच्या रुग्णांना उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये त्यांनी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे, हे सांगणार आहोत.
हिरव्या भाज्या खाव्यात – उन्हाळा सुरू झाला की सरबत आणि कोल्ड्रिंक पिण्यावर कोणीही आवर घालू शकत नाही. परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी या सर्व गोष्टी टाळून आहारामध्ये काकडी, कलिंगड, टरबूज अशी फळे खावीत. याचबरोबर दररोज एक तरी हिरवी पालेभाजी आहारात घ्यावी. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या फायदेशीर ठरतात.
फायबरयुक्त पदार्थ खावेत – मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात सर्वाधिक ओट्स, ब्राऊन राइस, तृणधान्ये अशा गोष्टी आहारात घ्याव्यात. जास्त फायबर असलेले अन्न खाल्ल्यास रक्तातील साखर वाढण्यास प्रतिबंध करते. तसेच वजन कमी होण्यास देखील मदत होते.
चहा कॉफी पिणे टाळाच – मधुमेहाचे अनेक रुग्ण विदाऊट शुगर चहा किंवा कॉफी घेत असतात. परंतु उन्हाळ्यामध्ये चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो अशा गोष्टी टाळून सफरचंदाचा ज्यूस आणि संत्रीचा ज्यूस प्यावा.
फळांचे सेवन वाढवा – उन्हाळ्यामध्ये फळांचे अधिक सेवन करणे कधीही चांगले ठरते. यामुळे शरीरात पाण्याची पातळी नियंत्रित राहते. तसेच वेगवेगळ्या फळांचे सेवन केल्यामुळे त्याचे विविध फायदे आरोग्याला होतात.
स्वीट कॉर्न खावू नये – स्वीट कॉर्न चाट म्हणून खायला अनेकांना आवडते. तसेच कॉर्न खाने शरीरासाठी फायद्याचे असते असे देखील अनेकवेळा सांगितले जाते. परंतु यात स्वीट कॉर्नमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप असते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी स्वीट कॉर्न खाऊ नयेत.