हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला अखेर अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : पंजाब नॅशनल बँकेच्या 14 हजार कोटी रुपयांच्या घोटाळयाचा मुख्य सूत्रधार असलेला फरार उद्योजक मेहुल चौकशीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. रविवारी चोक्सीने अँटिग्वा मधून पळ काढला होता. मात्र तीन दिवसांनंतर त्याला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त व तेथील स्थानिक वृत्त एजन्सीने दिले आहे. डोमिनिका या देशाच्या स्थानिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचने ही अटक केली आहे. तर निरव मोदी इंग्लंड जेलमध्ये आहे. निरवला भारतात आणण्यासाठी इंग्लंडच्या कोर्टात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणाबाबत बोलताना “मी त्यांच्या कुटुंबाशी बोललो आहे आणि त्यांचा पत्ता कळाला आहे याबद्दल समाधान आहे. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून त्यांना डोमिनिका इथं कसं नेलं हेच चित्र स्पष्ट समजू शकेल अशी माहिती मेहुलचे वकील विजय अग्रवाल यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे”.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मेहुल चोक्सी हा अँटिग्वा मधून रविवारी पळाला होता. तेव्हा पोलिसांनी चौकशीची शोधमोहीम सुरू केली होती तो क्युबा मध्ये पळाला असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. मात्र डोमिनिका मध्ये पोलिसांनी चोक्सीला अटक केली आहे. या न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार मेहुल चोक्सी सध्या पोलिसांच्या क्रिमिनल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट म्हणजेच CID च्या कस्टडीमध्ये आहे.

पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर 2018 साली मेहुल चोक्सी, निरव मोदी यांनी भारतातून पलायन केलं होत. चोक्सी कॅरिबियन देश अँटिग्वा मध्ये लपून होता. मात्र अँटिग्वा न्यूजरूम या स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार चौकशी रविवार पासून बेपत्ता झाला होता. रविवारी 23 मे रोजी संध्याकाळी पाच वाजून 15 मिनिटांनी चौकशी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला. तेव्हापासून तो त्या ठिकाणी नाही. त्यामुळे पोलिसांनी चोक्सीचा शोध सुरू केला होता. आज तीन दिवसांनी पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. चौकशीचे भारताला प्रत्यार्पण कधी केले जाणार याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही.

 

Leave a Comment