खरंच गडकरींना पाडण्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवली? काहीतरी शिजतंय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) पराभवासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नसल्याची खात्री पटल्यावर फडणवीस नाईलाजाने नागपूरच्या प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली, आणि हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात.” संजय राऊतांनी माध्यमांसमोर केलेला हा सर्वात मोठा गौप्यस्फोट… गडकरींचं राजकारण संपवण्यासाठी फडणवीस (Devendra Fadnavis) प्रयत्न करतायत, या त्यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं… भाजप पक्षातच एकमेकांना पाडण्यासाठी अंतर्गत चढाओढ लागलीय, असा अंदाज यावरून बांधता येऊ शकतो. पण दिल्लीच्या राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या मात्र तरीही राज्याच्या राजकारणात कसलाही हस्तक्षेप न करणाऱ्या गडकरींचा फडणवीसांना धोका का वाटतोय? राऊतांनी केलेल्या आरोपानुसार गडकरींना नागपूरमधून पाडून मोदी, शाह यांना नेमकं काय साध्य करायचंय? हे सगळं खरं असेल तर गडकरी निवडणूक हरले तर याचा फडणवीसांना काय फायदा होऊ शकतो? तेच पाहुयात

भाजपने आपल्या बऱ्याच यंत्रणांना गडकरींच्या विरोधात कामाला लावलं आहे. असं नेतृत्व नागपुरातच संपवलं पाहिजे हा प्रयत्न आज नाही तर आधीपासूनच भाजपाकडून सुरु आहे. अंबादास दानवे यांनी भाजपवर केलेला सनसनाटी आरोप. हे कमी होतं की काय म्हणून गडकरींच्या पराभवासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं हे सगळ्या नागपूरला माहिती आहे, असं म्हणून अनिल देशमुखांनीही या आगीत तेल ओतलं…तेव्हा भाजपच्या गोटात नेमकं काय राजकारण सुरुय? हे पाहणं महत्त्वाचं ठरतं…मोदी शहांचा गडकरींना असणारा विरोध आणि त्यासाठी फडणवीसांनी केलेली मदत या उठलेल्या वावड्यांना कोणतं पॉलिटिकल लॉजिक असू शकतं याचा जेव्हा आपण विचार करायला लागतो. तेव्हा पहिली गोष्ट समोर येते ती आरएसएसचा वाढू पाहणारा हस्तक्षेप…

Nitin Gadkari यांना पाडण्यासाठी,Devendra Fadnavis यांनी रसद पुरवली? काहीतरी शिजतंय | Nagpur Loksabha

आता पक्ष चालवण्यासाठी आम्हाला संघाच्या मदतीची गरज नाही, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेल्या या स्टेटमेंटमुळे नवं वावटळ उठलं… नरेंद्र मोदी, अमित शहा संघाला डावलून आपला कारभार चालवतात. त्यांना कोअर संघाची माणसं पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयात नको असतात. पण संघ अनेक दिवसांपासून या ना त्याकारणाने पक्षावर प्रभाव टाकतच असतो. गडकरी हे संघाच्या जास्त जवळचे मानले जातात. मोदींच्या दोन टर्म पूर्ण झाल्यानंतर आता दिल्लीत खांदेपालट होणार याच्या बऱ्याच चर्चा आहेत. त्यात गडकरी यांचं नाव टॉप लिस्टला असल्यामुळे मोदी शहा यांच्यासाठी ती गोष्ट अडचणीची ठरू शकते. मोदींच्या गॅरंटीवर शंका उपस्थित केली जाऊ शकते. पण नितीन गडकरींनी केलेल्या कामांवर सत्ताधारी पक्षासोबत विरोधकांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत असतो. त्यामुळे भाजपच्या तयार झालेल्या निगेटिव्ह इमेजला नीट करण्यासाठी आणि जनतेच्या मनातील धुमसणारा राग शांत करण्यासाठी गडकरींच्या नावाचा पंतप्रधान पदासाठी विचार होऊ शकतो. यासाठी मुळावरच घाव घालायचा म्हणून मोदी शहांकडून फडणवीसांना समोर करत गडकरींना नागपुरातच पाडण्याचा डाव कदाचित रचला गेला असावा…

अमित शहांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्पर्धेतल्या नावाचा नेहमीच विरोध होत आलाय. म्हणून गडकरी सारख्या अनुभवी नेत्यालाही एक खातं आणि एक मतदारसंघ यापूरतं मर्यादित ठेवण्यात आलय. मात्र तरीही गडकरींच्या नावाची क्रेज कायम असल्यामुळे पक्षातच हा पाडापाडीचा खेळ सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही…आता गडकरी हे दिल्ली लेवलच राजकारण करतात. त्यामुळे फडणवीसांच्या राज्यातील राजकारणाला त्याचा काही तोटा होत नाही. मग गडकरींना पाडून त्याचा फडणीसांना नेमका काय फायदा होतो? तर त्याच उत्तर समोर येतं दिल्लीच्या राजकारणातील स्पेस…

हे पण वाचा : भाजपने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींची उचल बांगडी केलीये??

तर मागच्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे लोकसभेनंतर फडणवीस राज्याच्या राजकारणातून दिल्लीत शिफ्ट होणार. अशा वेळेस त्यांच्यासमोर महाराष्ट्रातून सध्या दोनच चेहरे हे जास्त ॲक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळतात. एक म्हणजे विनोद तावडे. तर दुसरे नितीन गडकरी… तावडे आणि फडणवीस यांच्यातील वाद आपल्याला माहित आहेच. त्यामुळे तावडेंनी पक्षात तयार केलेल्या वर्चस्वाला धक्का द्यायचा असेल तर समांतर राजकारण खेळण्याशिवाय फडणवीसांकडे सध्यातरी दुसरा पर्याय दिसत नाही. अशावेळेस गडकरी यांचं राजकारण संपणं हे एक प्रकारे फडणवीसांच्या राष्ट्रीय महत्त्वकांक्षांना बळ देणारी घटना ठरू शकते. त्यात गडकरी हे नागपुरातून येत असल्याने नागपूर बेल्टवर आपला राजकीय दबदबा कायम रहावा. याचा देखील विचार फडणवीसांच्या बॅक ऑफ द माईंड सुरू असेल, याची शक्यता नाकारता येत नाही… बॉटम लाईन काय तर नरेंद्र मोदींना प्रतिस्पर्धी तयार होऊ नये आणि फडणीसांच्या राष्ट्रीय महत्वकांक्षांना बळ देण्यासाठी नितीन गडकरी लोकसभेला पडण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं असल्याचं राऊतांचं एकंदरीत म्हणणं असावं. बाकी तुम्हाला काय वाटतं? मोदी, शहा यांनी फडणवीसांच्या मदतीने गडकरींना पाडण्यासाठी रसद पुरवली असेल का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.