शेन वॉर्नच्या स्वप्नांत खरंच सचिन यायचा?? जाणून घ्या यामागील सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया चा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आपल्या जादुई फिरकीने जगभरातील फलंदाजाना नाचवणाऱ्या शेन वॉर्नसाठी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करने मात्र सोप्प नव्हतं. याचाच प्रत्यय म्हणून सचिन चक्क माझ्या स्वप्नात येतो अस विधान वॉर्न ने केलं होतं.

1998 साली शारजामध्ये झालेला शेन वॉर्न आणि सचिनचा मुकाबला चांगलाच आठवणीत आहे. त्यावेळी सचिनने या लेग स्पिनरची अशी काही धुलाई केली होती की त्याच्यासमोर शेन वॉर्न पूर्ण निष्प्रभ बनवलं. सचिनने वॉर्नची चौफेर धुलाई करत ऑस्ट्रेलियाला हरवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांनतर सचिन आपल्या स्वप्नात येतो अस वॉर्न म्हणाला होता. मात्र एका मुलाखती दरम्यान, आपण अस चेष्टेने आणि गमतीने म्हणलो होतो असे तो म्हणाला.

दरम्यान, शेन वॉर्न त्याच्या जादुई फिरकी साठी ओळखला जात होता. वॉर्नने भल्या भल्या फलंदाना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. 28 वर्षांपूर्वी त्याने अॅशेस मालिकेत इंग्लंडचा फलंदाज माइक गॅटिंग याला क्लिन बोल्ड करत सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं. कारण त्यानं टाकलेल्या चेंडूनं चक्क ९० डीग्री अंशात फिरकी घेतली होती आणि गॅटिंगचा त्रिफळा उडाला. माइक गॅटिंग याला तर काही क्षण आपल्यासोबत नेमकं काय घडलंय हेही कळालं नव्हतं. वॉर्नचा तो चेंडू बॉल ‘ऑफ द सेंच्युरी’ मानला जातो.