फाईव स्टार हॉटेलमध्ये मंत्री थांबले की नाही? अखेर मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

0
1
Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमध्ये वडेट्टीवार यांनी, “राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी” अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. तसेच त्यांनी, संभाजीनगर येथे होणाऱ्या बैठकीसाठी किती खर्च करण्यात आला आहे याचा हिशोब ट्विट करत मांडला होता. त्यांच्या आरोपांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे. तसेच टीका करण्यापूर्वी त्याची शहानिशा करावी असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

आज राज्य मंत्रिमंडळाची  बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी, फाईव स्टार हॉटेलमध्ये थांबलो की नाही याचे स्पष्टीकरण सर्वांपुढे दिले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “अरे भाऊ, आम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबलो नाहीत तर आम्ही शासकीय विश्रामगृहात थांबलो. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कोण थांबेल ते माहिती आहे ना? ते जे आलो होते ते धर्मशाळेत राहीले होते का? 100 रुम्स बुक केले होते ना, आम्ही कुठे थांबलोय याची आधी शाहनिशा तर करा” अशा शब्दात त्यांनी वडेट्टीवार यांना सुनावले.

विजय वडेट्टीवार यांचे आरोप

विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप करत, “राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला 1500 रुपयांची थाळी. दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन?” असा सवाल उपस्थित केला होता.

त्याचबरोबर, फाईव स्टार हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री), ताज हॉटेल 40 रूम बुक (सर्व सचिव), अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), अजंता अॅम्बेसेडर 40 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), महसूल प्रबोधिनी 100 रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे – 20 ( इतर अधिकारी) एकूण 150 गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली होती.

तसेच, औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार आहे. अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली होती. परंतु आता त्यांच्या या सर्व दाब्यांवर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.